MARATHI NEWSPAPER HAS DIFFERENTIATED MODI AS A NATION LOVER AND OTHER POLITICIANS AS MANY WIFE LOVERS

पत्नी वादा’वर मोदी समर्थकांचं वादग्रस्त पोस्टर

 
  • मोदी पोस्टर
  • मोदी पोस्टर
  • मोदी पोस्टर

वाराणसी: भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात पहिल्यांदाच आपली पत्नी जशोदाबेन यांचा उल्लेख केल्यावर त्यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांसह इतर नेते जोरदार टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी वादग्रस्त पोस्टर जारी करुन उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

या पोस्टरमध्ये नरेंद्र मोदींना ‘देश प्रेमी’ तर काँग्रेस तसंच सपाच्या नेत्यांना ‘पत्नी प्रेमी’ म्हटलं आहे. मोदींच्या प्रचार मोहीमेशी संबंधित अशोक चौरसिया यांनी हे पोस्टर जारी केलं आहे.

 

पोस्टर जारी केल्यानंतर चौरसिया म्हणाले की, ‘ही लढाई देश तसंच राष्ट्राच्या सेवेसाठी घर-कुटुंब सोडणाऱ्या एका देश प्रेमीची आणि जे फक्त पत्नीवर प्रेम करतात, देशावर नाही, अशा लोकांमधील आहे.’ 

 

पोस्टरच्या अर्ध्या भागात, ‘देश प्रेमी’ शिर्षकाखाली मोदींचा फोटो आहे तर अर्ध्या भागात ‘पत्नी प्रेमी’ शिर्षकाखाली पंडित जवाहरलाल नेहरु आणि एडविना माऊंटबॅटन, राहुल गांधींचं चुंबन घेणारी एक महिला, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान तसंच शशी थरुर यांचे फोटो आहेत. या सर्व नेत्यांच्या एकापेक्षा अधिक पत्नी असल्याचं म्हटलं आहे.

 

याआधी पत्नीचं नाव लपवणारे मोदी महिला सुरक्षा कशी करणार?, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी या वादग्रस्त पोस्टरद्वारे त्यांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s